रावेरला उद्योजक श्रीराम पाटील यांचा लवकरच रा.काँ.त प्रवेश

0
50

साईमत, रावेर : प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील लवकरच रावेरला आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

मुंबई येथील ‘देवगिरी’ या अजित पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी, ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजेला भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन श्रीराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचीही भेट घेतली. याप्रसंगी श्रीराम पाटील यांच्यासोबत जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, डी. डी. बच्छाव, रावेरचे माजी नगराध्यक्ष शितल पाटील, प्रा.गोपाल दर्जी, मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, भाऊसाहेब सुरेश पाटील, प्रवीण बोरसे, इरफान तडवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here