साईमत जळगाव प्रतिनिधी
महानगरपालिका व पर्यावरण विभागातर्फे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शासकीय तंत्र निकेतन येथे पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शासकीय तंत्र निकेतन मधील तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व, प्रदूषण व त्यामुळे मानवी जीवनावर, शहरावर तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणारे दुष्परिणाम यावर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या वरिष्ठ सल्लागार गीतांजली कौशिक यांनी मार्गदर्शन केले. केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचे महत्व त्यांनी विषद केले. वातावरणातील प्रदूषण मोजण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे, त्याचे मोजमाप, तसेच प्रदूषणावर नियंत्रणाचे उपाय त्यांनी त्यांचे कार्यक्रमात दिले. विद्यार्थ्यांशी हितगूज करतांना विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाचे पर्यावरण अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य पराग पाटील, प्राध्यापक आर. वाय. पाटील व प्राध्यापक यामिनी पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात पर्यावरण विभागाचे अनिल करोसिया, सुयश सोनटक्के, रसिका पाटील उपस्थित होते.