साईमत जळगाव प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या विद्यमाने आयोजित 14 वर्षातील मुले व मुली शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे 8 ते 10 जानेवारी दरम्यान आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातून मुलांच्या ८ मुलींच्या ८ संघांनी सहभाग नोंदवला स्पर्धा बात पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेतून राज्याचा संघ निवड करण्यात येणार आहे. सदर संघ छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल
दुपारच्या सत्रात तहसीलदार पंकज लोखंडे (महसूल) यांच्या हस्ते चेंडू टोलवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक फॉरेस्ट ऑफिसर नितीन बोरकर , आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू नरेश बागल , राज्य संघटनेचे वरिष्ठ संघटक पी ई तात्या पाटील , उपाध्यक्ष छोटू शेठ लेखराज ,दीपक जोशी तसेच राज्य संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवलकर, यावर्षीचे छत्रपती पुरस्कार विजेते किशोर चौधरी , अभिजीत इंगोले, सुमित तळवलकर, इकबाल मिर्झा, तसेच निवड समिती सदस्य गोकुळ तांदळे, किशोर चौधरी, हेमंत देशपांडे उपस्थित होते.
स्पर्धेत पंच म्हणून अक्षय येवले, आकाश सराफ, गणेश बेटूदे, विकास वानखेडे, स्वप्निल राऊत, उमेद विसपुते ,यश थोरात ,मोहित चौधरी , रोहित तुपारे ,मयुरेश अवसेकर यांनी काम पाहत आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे तालुका क्रीडा अधिकारी भरत देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, संजय मेहेरे, उमेश मराठे, विनोद माने, सह सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जळगाव जिल्हा संघटनेचे व राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत
