संगीत सम्राट उस्ताद रशिद खान यांचे निधन

0
40

कोलकाता : वृत्तसंस्था
संगीत क्षेत्रात विख्यात असलेले उत्साद रशिद खान यांचे आज (मंगळवारी) निधन झाले.वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सम्राट अशी ओळख असलेले उस्ताद रशिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली. कोलकाता या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उस्ताद राशिद खान यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयीची घोषणा केली.आम्ही त्यांना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण त्यांची प्राणज्योत मालवली असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here