साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नासिक अंतर्गत एकत्रितपणे बालसंस्कार शिबिर रविवार रोजी उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रा.विजय पवार, एस. एन. डि. टी. महाविद्यालयाच्या प्रा. नीता पाटील, छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अमोल कोल्हे, श्री स्वामी समर्थ केंद्राचे तालुका प्रतिनिधी संजय कासार, जिल्हा प्रतिनिधी एन. डि. बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुलांना अॅड. केतन सोनार मार्गदर्शन केले. शिबिरासाठी रामेश्वर कॉलनीसह, आनंद नगर, कांचन नगर, तळेले कॉलनी, अयोध्या नगर, बिब्बा नगर, कुसुंबा आणि आव्हाणे येथील सेवा केंद्रातील विद्यार्थी तसेच विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व त्यांचे चिरंजीव नितीन मोरे यांनी ऑनलाईन (लाईव्ह) मुलांना मार्गदर्शन केले. दरम्यान रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदीसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी एस. के. परखड, अमोल वाघ, वासुदेव बडगुजर, उज्वल पाटील, प्रकाश बाविस्कर, देवेंद्र मोझे, योगेश पाटील, उल्का वाघ, योगिता बाविस्कर, नेहा मंत्री, कोमल पाटील, वैशाली पाटील, सुनंदा मोझे आदींनी परिश्रम घेतले.