साईमत चोपडा प्रतिनिधी
यंदाचा पत्रकारदिन समारंभ शहरात आयोजित करून भारतीय पत्रकार महासंघाला भाषणबाजी करीत सत्काराचे हारतुरे मान्यवरांकडून घेता आले असते. मात्र पत्रकार आजही दीनदुबळ्यांच्या हितासाठी झटत आहेत, भारतीय पत्रकार महासंघाने दीनदुबळ्यांबद्दलची आपली प्रतिबध्दता अधोरेखित केली आहे. हे चित्र पाहून मनस्वी समाधान वाटले, असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले.
तालुक्यातील दुर्गम भागातील मन्यावस्ती या पाड्यावर भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने आरोग्य शिबीरात आदिवासी बांधवाची तपासणी व ब्लॅकेट वाटप करून ‘पत्रकार दिन‘ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन व ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
जनसमान्यांचा आधार स्तभ, या ब्रीदवाक्याप्रमाणे यावर्षीदेखील आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी आदिवासी बंधूना मिळणाऱ्या शासनाच्या योजनाबाबत चौकशी करून मोफत रेशन, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देऊन अधिकाऱ्यांना त्वरित शासकीय योजनांचा लाभ परिसरातील आदिवासींना मिळावा अशा सूचना केल्या
यावेळी प्रकाश सरदार यांनी आदिवासी बंधूंना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. आदिवासी बांधवाचे हक्क राज्यघटनेत काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय पत्रकार महासंघाच्या चोपडा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक साईमतचे मुख्य उपसंपादक राकेश कोल्हे, सल्लागार प्रकाश सरदार, दैनिक बातमीदारचे संपादक हेमंत पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी प. स. सभापती आत्माराम माळके, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, गजेंद्र जयसवाल, गोविंद सैदाणे, जिल्हा सरचिटणीस राकेश, कृउबा समिती संचालक डॉ. विकी सनेर, जि. प. सभापती दिनेश पाटील पाटील, मन्यावस्तीचे प्रमुख मन्या बारेला, उत्तर महाराष्ट्राध्यक्ष विलास पाटील आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वितेसाठी भारतीय पत्रकार महासंघाचे चोपडा तालुकाध्यक्ष तुषार सूर्यवंशी, सचिव तौसिफ़ खाटीक, पत्रकार पी. आर. माळी, मनोज मोरे, जितेंद्रकुमार शिंपी, मनोहर देशमुख, भगवान न्हायदे, रावसाहेब पाटील, राजेंद्र चोधरी, प्रशांत सोनवणे, राजेंद्र बोदडे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, गटप्रमुख एलीजा मोरे, आशावर्कर राहाबाई बारेला, आरोग्यसेविका भिकूताई बोदडे व आदिवासी बांधव उपस्थित होते. आभार पी. आर. माळी यांनी मानले.