जामठीचे ग्रामसेवक जी.एच.राठोड यांची तातडीने बदली

0
24

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील जामठी येथील महिला सरपंच शांताबाई पाटील ह्या आठ महिन्यापासून सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. आठ महिन्यात ग्रामसेवक जी.एच.राठोड यांनी कोणत्याही कामात सरपंच यांना विश्‍वासात न घेता कामे केल्याचे आरोप सरपंच यांनी केला आहे. येथील ग्रामनिधी गावातील नळपट्टी, पाणीपट्टी यांची वसुली रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर किती आहे हे वारंवार सरपंच यांनी विचारले. तेव्हा त्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली. तसेच शासकीय योजनेतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना किती घरकुले मंजूर करण्यात आली, किती पूर्ण झाली, किती प्रलंबित आहेत, याबाबत सरपंच ग्रामसेवकांना माहिती विचारायचे. परंतु त्या संदर्भात एकही घरकुलाची माहिती त्यांना मिळाली नाही. तसेच ग्रामसेवक हे वीस दिवसातून एक दिवस यायचे व ग्रामपंचायत कार्यालयात न थांबता बाहेरच्या बाहेर आपली कामे आटोपून निघून जायचे. त्यामुळे गावातील विकास कामे प्रलंबित पडून आहे. खोळंबली आहे, असे ग्रामसेवक राठोड यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करत सरपंच शांताबाई पाटील यांनी बोदवड पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी निशा जाधव यांना लेखी अर्ज देऊन ग्रामसेवकाची बदली करण्यात यावी, असे अर्जामध्ये नमूद केले आहेत.

ग्रामसेवक राठोड यांची पिंपळगाव बु., ता.भुसावळ येथून ग्रा. पं मुक्तड, ता.बोदवड हे त्यांना मुख्य कार्यालयीन गाव देण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांना जलचक्र, जामठी हे अतिरिक्त गाव देण्यात आले होते. परंतु जामठी येथील कामकाजाच्या सतत तक्रारी येत आहे. जामठी येथील सरपंच शांताबाई पाटील यांनी ग्रामसेवक गोविंद हिरासिंग राठोड यांची बदलीची मागणी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखी तक्रार देऊन केली होती. ग्रामसेवक दिलीप सोपान इंगळे यांना बोदवड कार्यालयीन आदेश पत्र देऊन २२ नोव्हेंबर २०२३ रोजी जामठी ग्रामपंचायतचा कार्यभार सोपविण्यात आला.

विद्यमान ग्रामसेवक दिलीप इंगळे यांच्याकडे कोणतेही नियुक्तीचे पत्र नसताना कार्यालयात आले. सदस्यांना बैठकांचे अजंडे काढण्याचे आदेश ग्रा. पं.च्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तत्कालीन ग्रामसेवक आणि ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांनी असे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचे विद्यमान ग्रामसेवक दिलीप इंगळे यांनी सांगितले.

जामठीतील सरपंचाच्या तक्रारीवरून मी स्वतः विद्यमान ग्रामसेवक दिलीप इंगळे यांना २२ नोव्हेंबर २०२३ रोजी जामठी येथील नियुक्तीचे पत्र देऊन कार्यभार सांभाळण्याचे आदेश दिले होते. परंतु ग्रा.पं.चे कर्मचारी व ग्रामसेवक इंगळे यांच्यात बाचाबाची झाली असता इंगळे हे कार्यालयात काही दिवस हजर झाले नाहीत. आज तत्कालीन ग्रामसेवक राठोड यांच्याकडून चार्ज घेऊन ग्रामसेवक इंगळे यांना सोपविण्यात आला आल्याचे गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here