Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»लोकसभा : मविआत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला
    राजकीय

    लोकसभा : मविआत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असे विधान केले. तसेच आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा करू. त्यात राज्यातील नेते नसतील असे म्हटले होते. मात्र, त्यावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला. आता नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाबाबत काँग्रेसचा राज्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा फाम्युला ठाकरे – पवार गटाला मान्य होईल का, वेगळा भाग आहे. दरम्यान, मातोश्रीवर पवार – ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाकडून ८ते१० जागा लढण्याची तयारी आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांचा समावेश आहे.
    राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दिल्लीच्या काँग्रेस बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस २२, शिवसेना ठाकरे गट १८, राष्ट्रवादी शरद पवार गट ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला २ जागा सोडण्यात येतील. हा फॉर्म्युला काँग्रेसकडून समोर आला आहे. दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींनी आढावा घेतला. त्यात राज्यातील नेते कोणकोणत्या जागा लढवू इच्छितात, कोणत्या जागांसाठी इच्छुक आहेत यावर चर्चा झाली. या बैठकीतून काँग्रेस २२ जागांसाठी आग्रही असल्याचे दिसते. ठाकरे गटाला २३ जागा हव्या होत्या परंतु काँग्रेसची इतक्या जागा सोडण्याची तयारी नसल्याचे दिसून येते.
    २०१९ नंतरच्या घडामोडीत अनेक पक्षांची राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढून १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता ती स्थिती नाही. त्यात उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्ष फुटलेला आहे. या दोन्ही गटाचे चिन्ह कोणते असेल हेदेखील अद्याप निश्चित नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झुकतं माप द्यावे आणि विधानसभा तसेच प्रादेशिक निवडणुकीत उद्धव ठाकरे-शरद पवार गटाला झुकतं माप द्यावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यात काँग्रेसनं विजय मिळवत सरकार बनवलं आहे. त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यात मविआच्या जागावाटपात काँग्रेस २२ जागांसाठी आग्रही राहणार असल्याचं कळालं आहे.
    दरम्यान, शरद पवार-उद्धव ठाकरे गटात मातोश्रीत बैठक झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाकडून १०-११ जागा लढण्याची तयारी आहे. त्यात शिरूर, सातारा, माढा, बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड, भिवंडी, अहमदनगर या जागांसाठी पवार गट आग्रही आहे. जानेवारीत पुन्हा ठाकरे-पवार गटात बैठक होणार आहे. एकीकडे दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आणि दुसरीकडे ठाकरे-पवार बैठक यामुळे जास्तीच्या जागा घेण्यासाठी मविआच्या सर्वच पक्षात चढाओढ लागल्याचं दिसून येते. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते आग्रही आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.