Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»छत्रपती संभाजी नगर»पाचोऱ्याचा तरुण दारुच्या नशेत घरात घुसला वृद्ध महिलेवर अत्याचार करत आवळला गळा
    छत्रपती संभाजी नगर

    पाचोऱ्याचा तरुण दारुच्या नशेत घरात घुसला वृद्ध महिलेवर अत्याचार करत आवळला गळा

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संभाजीनगर : वृत्तसंस्था
    बहिणीला भेटायला आलेल्या २४ वर्षीय नराधमाने बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत घरात घुसून त्या महिलेवर नराधमाने बलात्कार करून तिचा साडीने खून केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणी तात्काळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
    गुलाब आबा बेलदार (वय २४, रा. भोजे चिंचपुरे ता. पाचोरा जि.जळगाव) असे नराधमाचे नाव आहे.दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मूळचा पाचोरा येथील रहिवासी असलेला गुलाब हा त्याची बहीण लोणी खुर्द येथे राहते. या बहिणीला भेटण्यासाठी तो तिथे आला होता. बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या वृद्ध महिलेवर त्याने नजर ठेवली. लोणी खुर्द येथे ८५ वर्षीय महिला गेल्या अनेक वर्षांपासून एकटी राहत होती.
    दरम्यान, सोमवारी रात्री महिला झोपी गेली. यावेळी पहाटे दोनच्या सुमारास गुलाब हा दारूच्या नशेत वृद्ध महिलेच्या घरात शिरला. त्याने वृद्ध महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेवर बलात्कार करून तिचे डोके भिंतीवर आपटले. या झालेल्या झटापटीत महिलेच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यानंतर गुलाबने वृद्ध महिलेस साडीच्या साह्याने गळा आवळून खून केला.
    आवाज झाल्याने शेजारील नागरिक महिलेच्या घराशेजारी आले. गुलाबने ‘‘घरात चोर आले होते, त्यांनी मला मारहाण केली ते पळून गेले”, असा बहाणा त्याने केला. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलीस आल्यानंतर नागरिकांमध्ये उभा असलेल्या गुलाबवर पोलिसांचा संशय गेला. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chhatrapati Sambhajinagar:प्रचारादरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, शहरात तणाव

    January 7, 2026

    Ram Ghodke Appointed : कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्यपदी राम घोडके

    October 8, 2025

    artificial intelligence courses : शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा- अजित पवार

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.