Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»छत्रपती संभाजी नगर»आरक्षणासाठी तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विष पिऊन आयुष्य संपवले
    छत्रपती संभाजी नगर

    आरक्षणासाठी तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विष पिऊन आयुष्य संपवले

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    माझ्या मुलामुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना, माझ्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे भविष्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका ३९ वर्षीय तरुणाने शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे उघडकीस आली.
    दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की,विजय पुंडलिक राकडे रा. खामगाव (गोरक्ष) फुलंब्री असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विषारी औषध प्राशन करून स्वतःचे आयुष्य संपवले.आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एका चिठ्ठीवर मजकूर लिहिला होता. नातेवाईक व पोलिसांच्या हाती चिठ्ठी लागल्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले.त्यामध्ये लिहिले होते की, माझ्या मुलांना- मुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यासाठी मी काही करू शकत नाही.
    येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत आहे,अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला होता. दरम्यान ही बाब लक्षात येतात नातेवाईकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chhatrapati Sambhajinagar:प्रचारादरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, शहरात तणाव

    January 7, 2026

    Ram Ghodke Appointed : कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्यपदी राम घोडके

    October 8, 2025

    artificial intelligence courses : शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा- अजित पवार

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.