कत्तलीसाठी १३ उंट कोंबून घेऊन जाणारा ट्रक पकडला

0
19

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लुमखेडा, शिवार हतनूर धरणाच्या पुलाजवळ भारतीय वंशाचे दोन लाख ८५ हजार रुपये किमतीचे १३ उंट अतिशय निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून त्यांचे पाय व तोंड दोरीने बांधून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी दहा लाख रुपये किमतीची आयशर ट्रकला (क्र.सीजी १२ बीएच ३२८१) बुधवारी, ६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी पकडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक फरार झाल्याचे सांगण्यात आले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद भिमराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मकबूल खान फकरुद्दीन खान (वय ४५, रा.वरखेडा तह.आष्टा, जि. सिहोर), अरबाज खान शकील खान (वय २१, रा.अमरपुरा, तहसील जिल्हा देवास, मध्यप्रदेश) या दोघे आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. खालिद खान खलील खान (रा.नोशेराबाद, देवास, मध्यप्रदेश) हा आरोपी फरार झालेला आहे. तिघां आरोपींविरुद्ध गुरनं.२५६/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(घ),(ड),(च),(ज) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ६,९,११, व मोटर वाहन कायदा १९८९ चे कलम ८३ प्रमाणे सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडवी, पोलीस नाईक मोहसीन पठाण करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here