पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन

0
41

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांचा वाढदिवस ६ डिसेंबर ते १३ डिसेंबर यादरम्यान विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये विविध सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत श्री महामंडलेश्‍वर बालयोगीजी महाराज यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहे.

त्यात ६ ते ११ डिसेंबर दरम्यान १६ संघाचा सहभाग असणाऱ्या पंकज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ११ डिसेंबर रोजी प्लॅस्टिकमुक्त परिसर अभियान राबविण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा व सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. ६ ते १२ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांसाठी पाठांतर, गायन, वादन, नृत्य व वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच बुधवारी, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

पंकज शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले हे मितभाषी आणि आपल्या कामाप्रती निष्ठा असणारे व्यक्तीमत्व आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणे, ग्राहकांची सेवा करणे आणि समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणे ही भावना आणि शिकवण त्यांच्या वडिलांनी त्यांना दिली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाकरीता अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here