Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»मुक्ताईनगरला दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगरला दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoDecember 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या प्रवर्तन चौकातील दोन ते तीन दुकानांना गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? त्याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आग लागल्याने परिसरात बराच वेळ गोंधळ उडाला होता. तसेच नगरपंचायतीकडे अग्निशमन दलाची गाडी नसल्याने मदतकार्यात अडचणी आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.

    सविस्तर असे की, मुक्ताईनगर शहरात मधोमध असणाऱ्या प्रवर्तन चौकालगतच दोन ते तीन दुकानांना गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या दुकानांमधून आगीचे लोळ उठतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत बूट, चप्पलचे दुकान तसेच गोळी-बिस्किट, पान मसाल्याचे दुकान, किराण्याचे दुकान जळून खाक झाले आहे. दरम्यान, नागरिकांच्या प्रयत्नांनी अग्निशमन पथकाची गाडी येण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. आगीत सुमारे सहा ते सात लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले. त्यामुळे काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणता आली.

    डीपीडीसीतून अग्निशमन दलाच्या गाडीसाठी अद्याप निधी नाही….

    मुक्ताईनगर येथे यापूर्वीही दोन-तीन वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आग लागल्यावर सावदा, वरणगाव, भुसावळ, बोदवड येथून अग्निशमन दलाची गाडी मागवावी लागते. मुक्ताईनगरला नगरपंचायत होऊन येत्या ४ डिसेंबर रोजी सहा वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही मुक्ताईनगर नगरपंचायतीला अग्निशमन दलाची गाडी मिळालेली नाही. जिल्हा नियोजन बैठक (डीपीडीसी) मधून अग्निशमन दलाची गाडी घेण्यासाठी निधीची मागणी केली होती. परंतु निधी मिळाला नसल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर शेतकऱ्यांचा महामार्गावर उग्र रस्ता रोको आंदोलन

    February 3, 2026

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.