साईमत, यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील विरावली येथील १०० ते १२५ शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी पीक संरक्षण सोसायटी अवसायनात काढा, अशी मागणी यावल येथील सहाय्यक निबंधक यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
विरावली येथील काशिनाथ लक्ष्मण पाटील यांच्यासह शंभर ते सव्वाशे शेतकऱ्यांनी गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विरावली गावातील पीक संरक्षण सहकारी संस्था गत अनेक वर्षापासून बंद आहे. संस्थेचे कोणतेही कार्यालय नसुन संस्थेचे कामकाज बंद आहे. संस्थेत कोणतेही सभासद संकेत वाढ नसुन सर्व सभासदांचे ५०० रुपयाच्या आत भागभाडंवल आहे.त्यानुसार संस्था निधीची उभारणी करण्यास कसुरवार झाली आहे. अधिनियम, नियम व उपविधी यातील नोंदणी व व्यवस्थापनबाबतच्या कोणत्याही शर्तीचे अनुपालन करणे कायमचे बंद झालेले आहे. ते आपल्या सहाय्यक निबंध कार्यालयास सुध्दा ज्ञात आहे. संस्थेने उद्देश व सहकारी तत्त्वानुसार जनता आर्थिक हित व सर्व साधारण कल्याण संवर्धन करण्याचे बंद केले आहे.
कागदोपत्री कार्यरत असलेल्या सचिव, सदस्यांनी संस्थेची पुस्तके व कागदपत्रके त्यात खाडाखोड करणे, अनधिकृत फिरवाफिरव करणे, अन्य फेरफार करणे किंवा ती खोटी करणे अन्यथा लपवुन ठेवणे, खाडाखोड, नष्ट, फेरफार, नोंदी करण्यात किंवा लपवुन ठेवण्यात, नोंदवहीत व लेखापुस्तकात खोटी व लबाडीची नोंद करण्यात सहभागी झालेले आहे. पीक संरक्षण संस्था ही बंद असल्याने व तिचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने संस्था ही कामकाज करीत नसत्याने ती अवसायानात घेवून बंद करण्यात यावी, अशी मागणी विरावली गावासह परिसरातील १०० ते १२५ शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी निवेदनावर स्वाक्षरी करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, यावल यांच्याकडे मागणी केली आहे.