Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»मनोज जरांगे लहान, त्यांना अजून अभ्यासाची गरज
    राज्य

    मनोज जरांगे लहान, त्यांना अजून अभ्यासाची गरज

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : प्रतिनिधी

    मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचे आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावू नये. माझ्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते पण ते ओबीसींचे काढून दिले नव्हते, असे नारायण राणे यांनी म्हटले. ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
    यावेळी नारायण राणे यांना राज्यात सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाबाबत विचारणा करण्यात आली. यावर नारायण राणे यांनी म्हटले की, कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा ओबीसीची झुंज लावू नये, या मताचा मी आहे. मी मराठ्यांना आरक्षण दिले होते, पण ते ओबीसींचे काढून दिले नव्हते. ५२ टयांपुढे भारतीय घटनेनुसार सर्वेक्षण करुन एखाद्या समाजाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा हक्क राज्य सरकारला आहे. त्यानुसार मी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते पण ओबीसी समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला ते देण्यात यावे, या मताचा मी नाही. मराठ्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे, मराठ्यांमध्ये अनेकजण गरीब आहेत, असे नारायण राणे यांनी म्हटले.
    मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरची डेडलाईन दिली असून ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. याविषयी नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांनी अजून आरक्षणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ते अजून लहान आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्मांना आरक्षण कसं मिळतं, त्यासाठी घटनेत काय तरतुदी आहेत, याचा अभ्यास मनोज जरांगे पाटील यांनी करावा. मराठ्यांना विचारावे, ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा ओबीसीतून आरक्षण कधीच घेणार नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.