साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यात कोरोना काळातील केलेल्या कार्याची दखल घेऊन पो.कॉ. वसिम रहेमान मलिक यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणातून, जिल्ह्यासह गावातील घरोघरी जाऊन त्यांचे सर्वेक्षण करून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा गौरव व सन्मान करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेकडून पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येऊन पुरस्कार देण्यात आला. त्यात महाराष्ट्र पोलीस प्रशासनात सेवा बजावत असताना पो.कॉ. वसिम रहेमान मलिक यांनी कोरोना काळात पोलीस डिपार्टमेंटमधील पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाल्यास वसिम मलिक यांनी तात्काळ मदत व सर्व प्रोसेस करून त्वरित उपचार करवून घेऊन त्यांची प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत त्यांनी काळजी घेतली. तसेच वसिम मलिक हे सामाजिक कार्यातही नेहमी कार्यरत असतात. त्यांनी त्यांची मुलगी मारिया मलिकच्या पाचही वाढदिवस साजरा न करता गरजूंना अन्न, कपडे व इतर साहित्याचे वाटप केले आहे. त्यामुळे पो.कॉ. वसिम रहेमान मलिक यांना भुसावळ येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.