Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या
    राज्य

    कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 26, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हिंगोली : वृत्तसंस्था

    महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे.अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे पण मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवरून मागे हटण्यास तयार नाहीत. यानंतर आता छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गठीत केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती तत्काळ रद्द करा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावर ताबडतोब स्थगिती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. ते हिंगोली येथे ओबीसी एल्गार मोर्चात बोलत होते.
    छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की, “गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या. फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका, एवढंच माझं सांगणे आहे. त्यामुळे आमच्या काही मागण्या आहेत. जे मराठा समाजाच्या सारथीला मिळाले, तेच ओबीसी आणि महाज्योती, या सगळ्यांना मिळाले पाहिजे. आपण जी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती निर्माण केली आहे, ताबडतोब रद्द करावी. कारण सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितले आहे की, मराठा समाज मागास नाही.त्यामुळे या शिंदे समितीला काहीही अधिकार नाही.”
    छगन भुजबळ पुढे म्हणाले, “निरगुडे आयोग किंवा ओबीसी आयोगाला आदेश असतील की, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करा. पण तुम्ही मराठा समाजाचे मागासपण कसं सिद्ध कराल? त्यासाठी मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण होणार नाही. तसं चालणार नाही. आधी सर्वांचे सर्वेक्षण करा मग मराठा समाज इतरांच्या पुढे आहे की मागे आहे? हे तपासा मगच आरक्षण द्या. एकाच समाजाचे कसं काय सर्वेक्षण होऊ शकते. कुठला समाज कुठल्या समाजाच्या पुढे आहे, कुठला समाज कुठल्या समाजाच्या मागे आहे? हे तपासण्यासाठी तौलनिक अभ्यास करा. सगळ्यांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.मगच ठरवलं पाहिजे की, कोण मागास आहे आणि कोण पुढारलेले आहे.”
    ओबीसी जनमोर्चा आयोजित ओबीसी एल्गार महामेळाव्यात छगन भुजबळ यांनी त्यांच्या १५ ते २० सभा झाल्यानंतर आमची एक सभा होते, असे म्हटले. ते घरं पेटवत आहेत पण त्यांना सांगायचे आहे की, पेटवायला अक्कल लागत नाही तर पटवायला अक्कल लागते, असे छगन भुजबळ म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या कुटुंबाला आक्षेपार्ह मेसेज केले जात आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. अधिकाराची लढाई असते त्यावेळी आमंत्रणाची वाट बघत बसू नका, असे आवाहन भुजबळ यांनी इतर ओबीसी नेत्यांना केले. मनोज जरांगे म्हणतात की छगन भुजबळ म्हातारे झाले आहेत पण जेवढे माझे केस आहेत तितकी आंदोलन मी केली आहेत.आंदोलने मला नवी नाहीत, असे भुजबळ म्हणाले. विविध मागण्या करुन ओबीसींना आरक्षणातून बाहेर काढण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.

    हे चालणार नाही
    “शिंदे समिती जिथे गेली तिथे आधी म्हणाले ५ हजार कुणबी दाखले सापडले. दुसऱ्या दिवशी म्हणाले, साडेअकरा हजार कुणबी नोंदी आढळल्या. मग लाखो सापडले आणि आता दोन-तीन कोटी कुणबी कागदपत्रे सापडल्याचे समिती सांगत आहे.त्यामुळे मागील दोन महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या. हे चालणार नाही,” असा इशारा छगन भुजबळांनी दिला.

    भुजबळांकडून विषय भरकटवण्याचे
    काम – जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर
    छत्रपती संभाजीनगर : राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोलीतील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.भुजबळ विषय भरकटवण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडण्या केल्या, मराठ्यांनी तुम्हाला प्रतिष्ठेच्या पदावर नेलं होतं, ते तुम्ही तोडलं होतं, असे जरांगे यांनी म्हटले आहे. क्षीरसागर माणुसकीच्या भावनेतून भेटायला आले होते. अंतरवाली सराटीत महिलांवर हल्ला झाला तेव्हा भुजबळ भेटायला आले का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.छगन भुजबळ यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे,असेही जरांगे म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.