साईमत, जळगाव : प्रतिनिधी
पान्हेरा, ता.मोताळा, जि.बुलढाणा येथील कान्हू सती मातेच्या यात्रेत जळगावच्या आनंद लोकनाट्य मंडळातील दोन कलावंतांचा झालेल्या अपघाती घटनेत दुर्दैवी मृत पावलेल्या कलावंतांच्या कुटूंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपये मदत मिळावी, यासाठी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, कार्याध्यक्ष शेषराव गोपाळ, उपाध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांच्यासह खान्देशातील विविध लोककला प्रकारात कार्यरत ५० कलावंतांच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांना घटनेचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी लोककलावंत संतोष चौधरी, शालिक शांताराम रोहिनीकर, भीमा नामा अंजाळेकर, शांताराम चव्हाण दहिवदकर, भीमा भाऊ, रवि अंजाळेकर, बंडू नाना धुळेकर, रतन नगरदेवळेकर, धोंडू कोळी होळकर, दत्तुभाऊ सोनवणे भोकरकर, सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर आदी कलावंत उपस्थित होते.