Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»अयोध्येतील राम मंदिराला ५ कोटीचे दान
    राष्ट्रीय

    अयोध्येतील राम मंदिराला ५ कोटीचे दान

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    सरकारमध्ये गृहसचिव असलेले निवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मी नारायणन यांनी आपल्या आयुष्याची कमाई राम मंदिरासाठी दान केली आहे. नारायणन यांनी रामचरितमानसाठी ५कोटी रूपये दिले आहेत. ५ कोटी रुपये खर्चून तयार केलेले १५१ किलो रामचरितमानस मूर्तीसमोर बसवले जाणार आहे.
    या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्याचे असून २४ कॅरेट सोन्यात बुडवले जाणार आहे. त्यानंतर सोन्याने जडवलेली अक्षरे त्यावर लिहिली जातील. यासाठी तब्बल १४० किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोने लागणार आहे. सजावटीसाठी इतर धातू देखील वापरले जाणार आहेत. या पुस्तकासाठी नारायणन यांनी आपली सर्व मालमत्ता विकून सर्व खात्यांमधील पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच पत्नीसह अयोध्येला गेलेल्या नारायणन यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून यासाठी परवानगी घेतली
    होती.

    आईच्या इच्छेमुळे पडले
    लक्ष्मीनारायण नाव
    निवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले की, त्यांच्या आईच्या इच्छेमुळे त्यांचे हे नाव पडले. त्यांची आई गरोदर असताना दिल्लीच्या बिर्ला मंदिरात म्हणजेच लक्ष्मी नारायण मंदिरात प्रार्थना केली होती की, जर त्यांना मुलगा झाला तर त्याचे नाव लक्ष्मी नारायण असेल. मग त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि लक्ष्मीनारायणन असे नामकरण करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची देवावर अपार श्रद्धा आहे.

    कोण आहेत एस.
    लक्ष्मीनारायणन?
    एस. लक्ष्मीनारायण हे १९७०च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असून ते सध्या देखील दिल्लीतच वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील सुब्रमण्यम केंद्र सरकारमध्ये सचिव म्हणून कार्यरत होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.