साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
सावदा नगरपालिकातर्फे शहरवासीयांना आकारण्यात आलेला घरपट्टी कर हा चुकीचा आणि जास्तीचा आहे. न.पा.कडून शहरात योग्य त्या मुलभूत सुविधांचा अभाव असताना अशा प्रकारे कर स्वरुपी सर्वसामान्य माणसांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यात यावे, अशा जनहितार्थ मागणीचे निवेदन आ.चंद्रकांत पाटील यांना शहरातील समाजसेवक सोहेल खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी, युसूफ शाह, फरीद शेख, गौसखान सर, शाईस्ता सर, मनिष भंगाळे, निसार अहमद, इरफान मियां यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष अफसर खान उपस्थित होते. त्यानंतर कॅबिनेटच्या होणाऱ्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून दोन-तीन दिवसात थेट समस्यांचे समाधान वरणगाव न.पा.च्या धर्तीवर वाढीव कराला स्थागिती मिळवून देण्यात
निवेदनात म्हटले आहे की, येथील नगरपालिकेत प्रशासकीय राजवट आल्यापासून शहरात अस्वच्छतेच्या प्रकरणात वाढ झाली आहे.शहरातील गटारींची साफसफाईसह कचऱ्याची उचल वेळेवर होत नाही. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात प्रत्येक गल्ली बोळात डांस, मच्छरांचे साम्राज्य पसरले आहे. लोकांच्या आरोग्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. शहरातील अनेक रहिवासी भागात पाईपलाईन असून पिण्याचे पाणी येत नाही. तसेच नवीन हद्दवाढ झालेल्या क्षेत्रांमध्ये समस्याग्रस्त नागरिकांची तक्रारी प्राप्त झाल्यावर नगरपरिषदेने वाजवी मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी आजतागायत कोणतेच प्रयत्न केले नसतांना २०२३-२४ ते पुढील पाच वर्षासाठी शहरासह नवीन भागामध्ये अवाजवी स्वरुपात आकारलेल्या करासह न.पा.हद्दीतील कर आकारणी सर्वप्रथम पूर्णतः रद्द होवून पुन्हा नियमानुसार योग्यती कर आकारणी होवून मिळावी. जेणेकरुन सावदा वासियांचे आर्थिक शोषण थांबतील. तसेच शहरात ७ हजार करदात्यांना कराची आकारणी केल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नगरपालिका मुक्ताईनगर मतदारसंघातील असल्यामुळे आमदारांनी याकडे लक्ष देऊन वरणगाव नगरपालिकेच्या धर्तीवर तात्काळ गैरवाजवी आकारण्यात आलेल्या कराला स्थागिती मिळवून द्यावी. अशी मागणी केली आहे.