Google Pay चा UPI PIN विसरलात तरी टेन्शन नाही, जाणून घ्या सोपी पद्धत

0
36

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गेल्या काही वर्षांत डिजिटल किंवा ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्याकडे कल वाढला आहे. कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउन किंवा कडक निर्बंधांमुळे प्रत्यक्ष व्यवहारांवर मर्यादा आल्याने बहुतांश जणांनी ऑनलाइन पेमेंट प्रणाली वापरण्यावर भर दिल्याचं दिसून येतं. खरं तर आज ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम अशी अनेक मोबाइल अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्सवरून बिलं अदा करणं, खरेदी केल्यावर पेमेंट देण्यासह अगदी म्युच्युअल फंड, पॉलिसीचा प्रीमिअम भरण्यापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात. या अॅप्समधल्या वैविध्यपूर्ण सुविधांमुळे ऑनलाइन पेमेंट करणं अगदी सोपं झालं आहे. यात `गुगल पे` (Google Pay) हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या लक्षणीय आहे.

एखाद्यावेळी या अॅपवरून पेमेंट करताना युजर पिन (PIN) विसरला तर त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, पिन बदलण्याची किंवा नवा पिन जनरेट करण्याची पद्धत फार सोपी आहे. याविषयीची माहिती `एबीपी लाइव्ह डॉट कॉम`ने दिली आहे. गुगल पे अॅप हे ऑनलाइन पेमेंटकरिता प्राधान्यानं वापरलं जातं.

गुगल पेने आपल्या अॅपवरून युझर्सना विविध सुविधा देऊ केल्या आहेत. त्यात ऑनलाइन एफडी (Online FD) ही एक नवी सुविधा जोरदार चर्चेत आहे. या सुविधेचा वापर करून युझरला ऑनलाइन एफडी काढता येते. यासाठी युझरला प्रत्यक्ष बॅंक किंवा वित्तीय संस्थेच्या कार्यालयात जायची गरज राहिलेली नाही.

एखाद्या वेळी युझर गुगल अॅपवरून पेमेंट करताना पिन विसरतो. अशा वेळी त्याला अडचणींचा सामना करावा लागतो; मात्र नवा पिन जनरेट करणं अत्यंत सोपं आहे. तसंच गुगल पे वापरून एफडी करणंही तितकंच सुलभ आहे. गुगल पेवरून एफडी करण्यासाठी पुढीलप्रमाणे बिझनेस अँड बिल्सचे पर्याय निवडावेत.

फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) करण्यासाठी सर्वप्रथम गुगल पे अॅप सुरू करावं. त्यानंतर Equitas SFB ची निवड करावी आणि त्यानंतर Equitas सर्च करावं. त्यानंतर तुम्हाला Equitas small finance Bank by Setu असं लिहिलेलं दिसेल. त्यानंतर Get started वर क्लिक करावं.

यानंतर तुम्हाला Open FD in 2 Minutes असा पर्याय दिसेल. त्याखालच्या Invest Now वर क्लिक करावं. यानंतर तुम्हाला एफडीचे सर्व पर्याय दिसतील. आता Create FD वर क्लिक करावं.

त्यानंतर एफडीची रक्कम आणि व्याजदर तपासून घ्यावा. केवायसीची (KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि पिन कोड आदी माहिती भरावी. त्यानंतर Submit वर क्लिक करावं. अशा पद्धतीनं तुमचं एफडी अकाउंट (FD Account) सुरू होईल.

हे ही तुमचा क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा जास्त असेल तर LIC लोनवर देईल खास सवलत याच पद्धतीनं गुगल पेचा UPN PIN बदलण्यासाठी सर्वप्रथम अॅप सुरू करावं. त्यानंतर उजव्या बाजूला वर आपल्या फोटोवर क्लिक करावं. तिथे तुम्हाला बॅंक अकाउंटचे पर्याय दिसतील. त्यावर क्लिक करावं.

ज्या बॅंकेच्या अकाउंटचा पिन तुम्हाला बदलायचा आहे, त्या अकाउंटवर क्लिक करावं. त्यानंतर Forgot Pin अशा पर्यायावर क्लिक करावं. येथे डेबिट कार्डच्या expiry date सह शेवटचे सहा अंक भरावेत. येथे तुम्हाला नवा UPI PIN क्रिएट करता येईल. यानंतर तुम्हाला एक OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर तुमचा नवा पिन जनरेट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here