साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील हरताळे येथे प्लॉट वॉरीयरने प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. अंतिम सामना मल्हार बॉईज आणि प्लॉट वॉरीयर क्रिकेट टीममध्ये झाला. त्यात प्लॉट वॉरीयर संघ विजेता ठरला. विजेत्या संघास सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांच्यातर्फे स्मृतीचिन्ह देऊन बक्षीस वितरीत करण्यात आले.
विजेता संघात कर्णधार विकी निकम, यष्टीरक्षक अमोल जाधव, भारत इंगळे, सागर इंगळे, निलेश त्यागी, समाधान मोरे, शकील पठाण, झाकीर शेख, कदिर शेख, सचिन लांडगे, अमीन शेख, सचिन उबाळे, तुषार अवसरमल, अविनाश पानपाटील, विलास निकम यांचा समावेश होता. त्यात अनेक संघांनी सहभाग नोंदविला.