नवीदिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फूटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा सांगण्यात आला होता. आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात राष्ट्रवादी वरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी सुरू झाली आहे. आजची सुनावणी सुमारे पाऊन तास झाली तर पुढील सुनावणी शुक्रवारी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
यात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अजित गटाने चुकीची शपथपत्रे दाखल केले आहेत.सुनावणी झाल्यानंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अजित पवार गटाकडून खोटे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. असा आरोप केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सुद्धा निवडणूक आयोगातील सुनावणीसाठी हजर होते.निवडणूक आयोगातील या महत्त्वपूर्ण सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जातीने हजर होते.
राष्ट्रवादी काकांना की पुतण्यांना मिळणार?
अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत.त्यामुळे आता राष्ट्रवादी साहेबांना म्हणजेच काकांना मिळणार की दादांना मिळणार? असा प्रश्न आहे. या संदर्भात पुढील काळी दिवस सलग सुनावणी होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका शरद पवारांना भेटणार की, अजित पवारांना भेटणार? या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.