साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी जागतिक वारसा सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त घुसर्डी, पाथर्डी, नगरदेवळे जवळील संगमेश्वर महादेव मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्याचे आयोजन केले आहे. सर्व दुर्गसेवकांनी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड, चाळीसगाव येथे जमावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिलीप घोरपडे यांनी केले आहे.