साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सम्राट बळीराजा यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सम्राट बळीराजा यांनी शेतकरी कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण केले. कर्मकांडांना विरोध केला, म्हणून वामन बटूने त्यांना छळ, कपटाने याच मातीत गाडले. परंतु बळीचे राज्य हवे असेल, इडा, पिडा टाळायची असेल तर आम्हाला आपले सण, आपले महापुरुषांचे विचार जपले पाहिजेत, असे प्रा.चंद्रकांत ठाकरे यांनी सम्राट बळीराजा यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन प्रसंगी सांगितले.
यावेळी ए.बी.मोरे यांनी बळीराजाविषयी माहिती विशद केली. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, राजेंद्र पाटील, मुकुंद पाटील, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष खुशाल बिडे, सतीश सूर्यवंशी, बाळु पवार, जी.जी.वाघ आदी उपस्थित होते.