साईमत जळगाव प्रतिनिधी
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटींच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ आशियाई विकास बँक अर्थासाहित व नाबार्ड अर्थासहित योजनेतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी मिळाली असल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर होत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
आशियाई विकास बँक अर्थसाहित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव तालुक्यातील सार्वे खु. ते भोणे रस्त्यावर भोणे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी ८० लक्ष, चावलखेडा ते पष्टाने रस्यावरील गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे – ३ कोटी १८ लक्ष, झुरखेडा – खपाट ते पिंपळेसीम रस्त्यावर झुरखेडा गावाजवळ पुलाचे बांधकाम – २ कोटी ३८ लक्ष, जळगाव तालुक्यातील आसोदा ते भोलाणे रस्त्यावर पुलाचे बांधकाम – १ कोटी ३२ लक्ष व कानळदा ते रिधुर रस्त्यावर पुलाचे बांधकाम – ९५ लक्ष *तसेच* नाबार्ड अर्थासहित योजनेतर्गत प्रजिमा ५२ ते भामर्डी रस्त्यवर पुलाचे बांधकाम – १ कोटी ५० लक्ष , सांर्वे खु. भोणे रस्त्यावर सार्वे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी २० लक्ष अश्या ७ पुलंच्या कामासाठी १२ कोटी ३३ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाताचा प्रस्ताव विभागाचे कार्यकारी अभियंता संजय राठोड व उप अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. लवकरच या पुलंच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या संदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, रस्ते व पूल मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर जनतेचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा – गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात महामार्गासारखे दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने मतदार संघातील ७ पुलांसाठी १२ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.