आंतर महाविद्यालयीन अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0
12

साईमत जळगाव प्रतिनिधी

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन अभिरुप न्यायालय स्पर्धेचे पारितोषिक वितरण केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, प्रमुख पाहुणे डॉ. नितीन धांडे, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे फिरते चषक धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. तर धुळे येथील एस. एम. बियाणी विधी महाविद्यालयाच्या संघास उपविजेते चषक बहाल करण्यात आले. उत्कृष्ट मेमोरियल चे पारितोषिक एस. एम. बीयाणी विधी महाविद्यालयाच्या संघास मिळाले. उत्कृष्ट विद्यार्थी अधिवक्ता पारितोषिक बियाणी विधी महाविद्यालयाच्या आनंद चव्हाण यास मिळाले तर उत्कृष्ट विद्यार्थिनी अधिवक्ता एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या साक्षी शुक्ला हिने प्राप्त केले.

तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय एस.पी. सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क. ब. चौ. उमवि च्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. के सी ई सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, अभिरूप न्यायालय समन्वयिका डॉ. विजेता सिंग हे होते.
कार्यक्रमास डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अंजली बोंदर, प्रा. अमिता वराडे, प्रा. शरद चव्हाण, प्रा. बी.एस. पाटील, डॉ. ललिता सपकाळे, प्रा. स्वाती लोखंडे, ॲड. सागर चित्रे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना न्या. एस. पी. सय्यद यांनी लोकांची मूलभूत कर्तव्य आणि मोफत विधी सेवा कायदा या संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे स्पर्धेच्या आयोजनामागील विद्यार्थी विकास विभागाची भूमिका स्पष्ट करून वकिलांनी सामान्य लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे हे अधोरेखित केले. ॲड. जंगले यांनी अध्यक्षीय समारोप करताना वकील हा समाजाचा अभियंता असतो त्याने केवळ पैशाला महत्त्व न देता सामान्य लोकाप्रती नैतिकदृष्ट्या बांधील राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी केले. उद्घाटन समारंभाचा आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अंजली बोंदर यांनी मानले.
बक्षीस वितरण समारंभात अॅड. प्रमोद पाटील, डॉ. नितीन धांडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. विजेत्यांच्या नावाची घोषणा डॉ. डी. आर. क्षीरसागर यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण ॲड. सौरभ मुंदडा, ॲड. सागर चित्रे, ॲड. महेश भोकरीकर, ॲड. आनंद मुजुमदार यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रुती शुक्ला, साक्षी शुक्ला आणि अमिषा मुंदडा यांनी केले. शेवटी मोठ कोर्ट समन्वयिका डॉ. विजेता सिंग यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here