साईमत जळगाव प्रतिनिधी
कै. सूनीताताई जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय हरित सेनेमार्फत शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी “फटाके मुक्त, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
यावेळी राष्ट्रीय हरित सेनाप्रमुख संजय बाविस्कर यांनी फटाक्यांमुळे अनेक अपघात होतात, तसेच हवेचे प्रदूषण, ध्वनीचे प्रदूषण होते, यामुळे हवेत कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड या वायूंचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो, तसेच डोळ्यांची जळजळ आणि आग होते, वयोवृद्ध लोकांना आवाजामुळे त्रास होतो, यासाठी आपण सर्वांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी असे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमासाठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक श्री निकम सर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस. डी. भीरुड सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.