Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»दिलीप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; निरगुडसर ग्रा.पं.मध्ये धोबीपछाड
    राज्य

    दिलीप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; निरगुडसर ग्रा.पं.मध्ये धोबीपछाड

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : प्रतिनिधी

    राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत निवडणूक. या निवडणुकीत ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. शिंदे गटाने वळसे पाटील यांना धोबीपछाड देत ७३ वर्षांची सत्ता उधळून लावली आहेत्यामुळे वळसे पाटील आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
    बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायती यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व दाखवत ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली आहे मात्र दिलीप वळसे पाटील यांना सत्ता राखण्यात यश आलेले नाही. दिलीप वळसे पाटील यांच्या गावातच धोबीपछाड देण्यात आढळराव पाटील यांना यश आले आहे.
    राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादी कांँग्रेसमध्ये पडलेले दोन गट याचा या निवडणुकीत विरोधकांना फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील यांनी गावोगावी आपले दौरे सुरू केले होते. गावातल्या जवळपास सर्वच सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांना आढळराव पाटील हजेरी लावत होते. त्याचाच फायदा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटाला झाला असल्याचे बोलले जात आहे.
    राष्ट्रवादीत फूट पडून दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते.शरद पवार यांचे सर्वात विश्वासू नेते म्हणून वळसे पाटील यांची ओळख होती. मात्र वळसे पाटील यांच्या निर्णयामुळे कुठे तरी येथील फटका बसल्याचे बोलले जात आहे मात्र दिलीप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला निरगुडसर येथे शिंदे गटाने सुरुंग लावला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Gangster Bandu Andekar’s House : अजित पवारांच्या पक्षाने कुख्यात गुंड बंडू आंदेकरांच्या घरात दिली २ तिकीटं; नव्या वादाला तोंड फुटणार?

    December 30, 2025

    Sai Devotees In Shirdi : शिर्डीत साई भक्तांचा महापूर ; नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासन सज्ज

    December 27, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.