साईमत जळगाव प्रतिनिधी
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव तर्फे रंगभूमी दिनाचे औचित्य साधून प्रेत यात्रा घेऊन जाणाऱ्या शव वाहिनीचे लोकार्पण जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, माजी महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या यावेळी भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव व सर्व कार्यकर्ते यांनी प्रमुख पाहुणे सतीश मदाने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा व माजी महापौर सीमाताई भोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास यशवंते यांनी व आभार प्रदर्शन प्रबुद्ध भालेराव यांनी केले.
यावेळी अरुण सोनवणे, प्रवीण सपकाळे, दीपक जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र मराठे, माजी नगरसेवक अमोल सांगोरे, हेमंत चंदनकर, विलास मते, विठ्ठल भालेराव, भाऊराव सुरळकर, कुलदीप भालेराव, प्रबुद्ध भालेराव, वैभव सोनवणे आदी उपस्थित होते.