साईमत जळगाव प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, विभागस्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन नुकतेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॅश अॅकॅडमीच्या १७ खेळाडूंची शालेय राज्यस्तर स्पर्धेत निवड करण्यात आली.
स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील नाशिक, धुळे व जळगांव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. राज्य स्तर स्क्वॅश स्पर्धेकरिता एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीतील निवड झालेल्या खेळाडूमध्ये १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये आर्या देशपांडे, इशा देशपांडे , पल्लवी मांडे, मुले- अथर्व खांडरे, यश हेमनानी, तन्मय पाटील, आरुष चौधरी , रिषभ चिरमाडे. १७ वर्षे वयोगट मुलींमध्ये अनुष्का वाणी, हर्षिता पाटील, व्रिती सोन्गती. मुले- प्रथमेश महाजन, विवेक कोल्हे, दक्षित महाजन. १९ वर्षे वयोगट मुले- यश पाटील, हर्षद जाधव , जयराज महाजन यांचा समावेश आहेत. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रा. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. रणजीत पाटील तसेच प्रशिक्षक प्रा. प्रविण कोल्हे यांनी अभिनंदन केले.