साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही धरणगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर तिच्या वडिलांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोती पवार करीत आहे.