Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ
    चाळीसगाव

    चाळीसगाव तालुका बौद्ध पंचायतच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 26, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    विजयादशमी आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून तालुका बौद्ध पंचायतच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायतीचे अध्यक्ष तथा माजी आमदार साहेबराव घोडे, तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण, माजी आ.राजीव देशमुख, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल, दै.’ग्रामस्थ’चे संपादक किसनराव जोर्वेकर, चा.ए.सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्या हस्ते समारंभ झाला. पंचायतीचे कार्याध्यक्ष गौतम झाल्टे, उपाध्यक्ष रामचंद्र जाधव, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, संचालक गौतम जाधव, राहुल जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
    प्रास्ताविक संस्थेतर्फे सरचिटणीस धर्मभूषण बागुल यांनी केले. त्यांनी तालुक्यात १० एकर जमिनीवर १० कोटीचे भव्य असे बौद्धविहार उभारण्याची संस्थेची योजना आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांना याबाबतची योजना समजावून सांगितली. सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहन केले.

    समाज कार्यासाठी जमा केलेल्या रकमेतून १ रुपयाही स्वतःसाठी खर्च करणे यापेक्षा नीचपणा दुसरा कोणताही असू शकत नाही. अतिशय प्रामाणिकपणे काम करून आपण सर्वांच्या मदतीने हे बौद्ध विहार उभारले जाणार आहे. तसेच बौद्धविहारात तथागत बुद्धांचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महान मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. येथे आदर्श माणूस, आदर्श समाज आणि एकसंघ राष्ट्र घडविण्याचे कार्य केले जाईल. बौद्ध पंचायतीत तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मान्य असलेल्या कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला सामावून घेतले जाईल, असेही प्रतिपादन केले. शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी स्मारक झाले पाहिजे, यासाठी न. पा.प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी बागुल यांनी केली.

    अध्यक्षीय मनोगतात माजी आ.घोडे यांनी बौद्ध विहारासोबतच दीनबंधु आंबेडकर आश्रम ऐतिहासिक संस्थेच्या विकासासाठी शासनस्तरावर चालविलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ही संस्था लवकरच उभी राहील, असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. कार्यालयाचे उद्घाटक आ. मंगेश चव्हाण यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी मदत करण्यास संस्थेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख पाहुणे किसनराव जोर्वेकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी धम्मदान देणारे बांधव सुधाकर मोरे, कारभारी केदार, रवी भालेराव, इंजि.रवी नागदिवे, इंजि.आदित्य फुले यांचा सत्कार पंचायततर्फे करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन करण्यात आली. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. सोनाली लोखंडे यांनी सर्वांना त्रिशरण व पंचशील दिले.

    यांची होती उपस्थिती

    यावेळी बौद्धाचार्य भैय्यासाहेब ब्राम्हणे डॉ.वसंतराव मोरे, किसन मोरे, डॉ.छाया निकम, संभा जाधव, देविदास जाधव, सुजित जाधव, दादासाहेब दाभाडे, रावसाहेब जगताप, आनंदा बागुल, प्रभाकर पारवे, बाजीराव गुजर, मिठाराम गुजर, संजय गुजर, मुकेश जाधव, ॲड.तुषार पाटील, प्रा.निलेश पाटील, भैय्या खरात, उत्तम निकम, चिंतामण निकम, सुरेश मोरे, वसंतराव मरसाळे, नानासाहेब सोनवणे(कर्जत), सी.बी.मोरे, पितांबर झाल्टे, अरुण निकम यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी महेंद्र जाधव, स्वप्नील जाधव, नितीन मरसाळे, बाबा पगारे, विष्णू जाधव, ज्ञानेश्वर बागुल, महेंद्र निकम पाटणा, मनोज जाधव, निवृत्ती बागुल, बंटी जाधव, सागर निकम, प्रदीप अहिरे, विश्वजित जगताप, सुरेश पगारे, दीपक बागुल, राजू अहिरे, माया अहिरे, गणेश बागुल, जितेंद्र महाले, नाना घोडेस्वार, अवधेश बागुल, धनंजय अहिरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व्यवस्थापक समितीचे सदस्य रवींद्र निकम यांनी केले. बाबा मंडप डेकोरेटर्स, नक्षत्र इव्हेंट यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Chalisgaon : वॉर्ड क्रमांक १६ बाराभाई मोहल्ल्यात पथदिवे बंद तर गटारी तुंबल्या

    December 18, 2025

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन सर्रासपणे सुरू

    December 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.