Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय
    क्रीडा

    अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय

    SaimatBy SaimatOctober 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चेन्नई : वृत्तसंस्था

    आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाने आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद केली. चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ८ विकेटनी विजय मिळवला. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध ६९ धावांनी विजय मिळून खळबळ उडवली होती. तेव्हा तो स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल ठरला होता. त्यानंतर अफगाण संघाने आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद केली. वनडे क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. याआधी दोन्ही संघात ७ लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व पाकिस्तानने जिंकल्या होत्या.

    प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर २८३ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर आणि अफगाणिस्तानचा अनुभव लक्षात घेता ही धावसंख्या आव्हानात्मक होती. पण अफगाणिस्तानचे सलामीवीर तयारीत आले होते. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झारदान यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदार करून विजयाचा पाया तयार केला. २२व्या षटकात गुरबाज बाद झाला. त्याने ५३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांसह ६५ धावा केल्या. गुरबाज आणि झारदान यांनी पहिल्या विकेटसाठई १३० धावांची भागिदारी केली. त्यानंतर आलेल्या रहमत शाह यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. झारदान शतक पूर्ण करेल असे वाटत असताना तो ८७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने शाहसोबत नाबाद भागिदारीकरून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळून दिला. शाहने ८४ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ७७ धावा केल्या. तर कर्णधार शाहितीने ४५ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ९६ धावांची भागिदारी केली.

    पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागिदारी केली. इमाम-उल-हक १७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार बाबर आझम यांनी संघाला १००च्या पुढे पोहोचवले. शफीक ५८ धावांवर बाद झाला. त्यानंतर आझमने एकहाती संघाची धावसंख्या पुढे नेली. मोहम्मद रिझवान फक्त ८ धावांवर बाद झाला. सौद शकील २५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर शतकाच्या जवळ पोहोचलेला बाबरला ७४ धावांवर नूर मोहम्मदने बाद केले. अखेरच्या षटकांत शादाब खान (३८ चेंडूत ४०) आणि इफ्तिखार अहमद (२७ चेंडूत ४०) यांच्या खेळीमुळे पाकिस्तानला ५० षटकात २८२ धावांपर्यंत मजल मारता आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Indian cricketer : “रिंकू सिंहच्या रीलमुळे वादग्रस्त संघर्ष! देवतांचे चित्रण पोलीस तक्रारीत”

    January 19, 2026

    Cricket : बॅट हातातच होती… अन् जीवनाची इनिंग संपली

    January 9, 2026

    Hardik Pandya : हार्दिक पंड्या झंझावाती! विजय हजारे स्पर्धेत १३३ धावांचे धडाकेबंद शतक

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.