नवरात्री उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान

0
37

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शना नुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात तरुण कुढापा चौक, जुने जळगाव या ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य अभियानात नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर, डोळ्यांची तपासणी आणि शुगर तपासणी करण्यात आली. दिवसभरात १४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. पुढील तीन दिवसात वाल्मिक नगर, शिवाजी नगर तसेच मिल्लत नगर परिसरात हे अभियान राबविले जाणार आहे.

या अभियानासाठी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रूग्णालय जळगांवचे डॉ. रितेश पाटील, डॉ. केयुर चौधरी, डॉ. सतीष पाटील डॉ. मिताली पाटील, डॉ. मनोज विसपुते, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाचे डॉ. सुसे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डोळे तपासणी विभागातील डॉक्टर्स, रेडक्रॉसचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here