चाळीसगाव महाविद्यालयात एनसीसीतर्फे तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती रॅलीसह व्याख्यान

0
38

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील बी.पी. आर्ट्‌स, एस.एम. ए. सायन्स आणि के.के. सी. कॉमर्स महाविद्यालयात ४८ महाराष्ट्र बटालियन यांच्या आदेशानुसार ‘एनसीसी विभाग’, ए. बी. बॉईज हायस्कूलचा एनसीसी विभाग आणि ए. बी. गर्ल्स हायस्कूलचा एनसीसी विभाग या तीनही विभागाच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ च्या निमित्त रॅली तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमानिमित्त तृणधान्यांवर आधारित माहितीचे पोस्टर बनवून रॅलीत त्याचा उपयोग केला. रॅली महाविद्यालयापासून निघून आजूबाजूच्या परिसरात जनजागृती करून पुन्हा महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन ए. बी. बॉईज हायस्कूलचे चेअरमन आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक उद्योगपती योगेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तृणधान्याचे महत्त्व एनसीसी छात्र सैनिकांना सांगून एनसीसीचे विद्यार्थी देश, समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे कसे आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार आणि त्याचे महत्त्व नमूद केले. तसेच याविषयी मार्गदर्शन केले.

उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी एल.वसईकर तसेच महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. आर. एन. चंदनशिव आणि ए.बी. बॉईज एनसीसी विभाग प्रमुख एस.एस. पाटील आणि ए.बी. गर्ल्स हायस्कूलच्या प्रमुख सौ. अहिरे उपस्थित होते. रॅलीमधील तीनही विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्लाईड शोद्वारे तसेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ च्या जनजागृतीनिमित्त उपप्राचार्य डी. एल. वसईकर यांनी मार्गदर्शन केले. तृणधान्य पौष्टिक आहारात वापरासाठी शपथ देण्यात आली. मार्गदर्शनात त्यांनी आरोग्य विषयक महत्त्व तसेच तृणधान्याचे महत्त्व विशद केले.

यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे सीनियर किशन मिश्रा, रोहित पाटील यांच्यासह सर्व छात्र सैनिकांनी परिश्रम घेतले. रॅली प्रसंगी तसेच व्याख्यानानंतर ए.बी. बॉईज एनसीसी विभागाचे प्रमुख सीनियर ऑफिसर एस. एस.पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here