यावलला जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्रीचा उत्सव

0
84

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्री उत्सवानिमित्त दांडिया सेलिब्रेशन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला प्राचार्य रंजना महाजन आणि प्राचार्य डॉ.किरण खेट्टे यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

नवरात्रीनिमित्त मुलांनी गरबा रास खेळून आनंद व्यक्त केला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारतीयांच्या आदिम वस्त्र परंपरेशी नाते सांगत घागरा, लेहेंगा, चोळी, ओढणी आदी लोकप्रिय पोशाख मुलींनी परिधान करत तसेच मुलांनी आपल्या आवडत्या वस्त्र संस्कृती, संस्कृतीचे प्रदर्शन करून नवरात्री उत्सव कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने आनंद घेतला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रवेशक राजश्री लोखंडे, गौरी भिरूड यांनी केले. यावेळी प्रियांका फेगडे यांनी मुलांना नवरात्र उत्सवाचे महत्त्व आणि माहिती दिली. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षका वैशाली अडकमोल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here