साईमत जळगाव प्रतिनिधी
महासंघ जळगाव तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळा संपर्क साधण्याच्या हेतूने विद्यार्थी दैवत मानून विद्यार्थींमधिल सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यासाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी वर्षा आबासाहेब अहिरराव व सुमन दोधू लोखंडे यांचे दातृत्व लाभले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खलिल शेख, शालेय पोषण अधीक्षक विजय पवार, संजय खंबायत, वर्षा अहिरराव, अशोक मदाने ,राज्य सहसचिव टि. के. पाटील, राज्य सदस्य देवेन्द्र चौधरी, राज्य शिक्षकेतर प्रतिंनिधी सोमनाथ लोखंडे, सविता चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन हे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी अखतरुद्दीन काझी , शाम ठाकरे , सुनील पवार, गोविंदा लोखंडे, प्रफ्फुल सरोदे , गणेश लोडते , सुषमा साळुंखे , विद्या कोल्हे आदि जिल्हा सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तालुका निलेश मोरे तर सूत्रसंचालन हर्षाली पाटील व आभार प्रदर्शन कैलास थोरवे यांनी केले.
यशस्वीतेसाठी स्पर्धा प्रकल्प प्रमुख कैलास थोरवे, कल्पना सोनवणे, निखिल जोगी, अध्यक्ष निलेश मोरे, सचिव राहुल चौधरी, केतन ब-हाटे, उपाध्यक्ष प्रतीक्षा पाटील जाकिर अली आबिद अली ,जाकिर हुसेन शेख अहमद , प्रमोद झलवार , सागर पाटील , सागर झांबरे , जुबेर अहमद शेख मुसा , विनोद शेलवडकर आदींनी परिश्रम घेतले.