साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी, १९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी, २० ऑक्टाबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी, १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. परंतू मुलीबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात तिच्या वडिलांना शुक्रवारी, २० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. विजय चौधरी करीत आहे.