साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील गणेश रसवंतीच्या चालकाने ग्राहकाची साधारण एक लाखाची सोन्याची पुडी परत करून प्रामाणिकपणा दाखविला. चौधरी यांचा प्रामाणिकपणा पाहून पंकज दुसाने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट आणि पेढे देऊन त्यांचा सत्कार करुन आभार मानले. त्याबद्दल त्यांच्या प्रामाणिकपणाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पी.एन.ज्वेलर्सचे संचालक पंकज दुसाने हे बाजारातील गणेश रसवंतीत रस पिण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे त्यांची सोन्याची एक पुडी तेथेच पडली. दुसाने हे घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सकाळी सर्वत्र शोध घेतला. मात्र, सोन्याची पुडी सापडली नाही. दिवसभरात कुठे-कुठे गेले त्या मार्गाने शोधत-शोधत ते गणेश रसवंतीवर गेले. तेव्हा दुकानाचे चालक नामदेव सदाशिव चौधरी, दिनेश चौधरी यांनी संपूर्ण शहानिशा करून खात्री झाल्यावर ती सोन्याची पुडी प्रामाणिकपणे परत केली.