स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी समर्पित भावना ठेवा – डॉ. उल्हास पाटील

0
35

साईमत जळगाव प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून नाक-कान-घसा विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहे. विशेषत: अभ्यासक्रमावर आधारीत हे उपक्रम असून या विभागात रूग्णसेवा प्रभावी क्षमतेने वाढली आहे. नाक-कान-घसा विभागातर्फे आयोजित प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यसाठी समर्पित भावना ठेवा असा सल्ला गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागातर्फे क्वीज बी-२०२३ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, नाक-कान-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. तन्वी पाटील, डॉ. तृप्ती भट, डॉ. जान्हवी बनकर, डॉ. रितु रावल, डॉ. चारू सोनवणे, डॉ. सायकत बासू आदी उपस्थित होते. या स्पर्धेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात संघांनी सहभाग घेतला होता. त्यात दोन संघ विजयी ठरले असून इतर संघाला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देण्यात आले. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभ्यासक्रमाशी निगडीत अशा प्रश्‍नमंजूषा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here