साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या रावेर विभागाच्यावतीने भुसावळ येथे शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नाहाटा कॉलेज जवळील माळी समाज मंगल कार्यालय माळी भवन येथे ‘ओबीसी आरक्षण अधिकार’ महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा विभागातील भुसावळ येथे ‘ओबीसी आरक्षण अधिकार’ महामेळावा होत आहे. महामेळाव्यात ओबीसी आरक्षणावर गदा येता कामा नये, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासह अनेक मागण्या मेळाव्यात होणार आहे.
मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक समता परिषदचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीपअण्णा खैरे, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, अशोक नडे, ज्ञानेश्वर महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महामेळाव्याला रावेर लोकसभा विभागातील भुसावळ, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल येथील ओबीसी घटकातील समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने यावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रा.जतिन मेढे, जामनेर तालुकाध्यक्ष नरेश महाजन, कार्याध्यक्ष पवन माळी, बोदवड तालुकाध्यक्ष दिनेश माळी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष राजु माळी, रावेर तालुकाध्यक्ष, यावल तालुकाध्यक्ष सुभाष महाजन यांनी केले आहे.