खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लुट थांबविण्याची युवासेनेची मागणी

0
34

साईमत जळगाव प्रतिनिधी

खाजगी वाहतुक बस, ट्रॅव्हल्स सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लुट त्वरीत थांबवावी अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांना बेकायदा तिकीट विरोधाक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख प्रितम शिंदे, कालेज कक्ष जिल्हा युवाधिकारी, हर्षल मुंडे, संदिप सुर्यवंशी, विभागीय युवाधिकारी, सचिन सोनवणे, शहर समन्वयक यश राठोड, शाखा प्रमुख तन्मय मनोरे, उपशाखा प्रमुख ओम पाटील, जयेश ठाकूर, सुरज परदेशी, चिन्मय सोनार, आकिब शेख, कुणाल बाविस्कर, आर्यन सुरवाडे, मोहित पाटील आदि युवासैनिक उपस्थित होते.
खाजगी वाहने आणि ट्रॅव्हल्ससाठी भाडे एसटी भाडेपेक्षा ५०% अधिक आहे. प्रशासनाने प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्यांनवर कारवाई करावी. प्रशासनाने तक्रारी आल्यानंतर संबंधितांवर योग्य वेळेत कार्यवाही केली नाही तर युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही युवासेनेतर्फे देण्यात आला.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी पुढच्या आठवड्यात खाजगी टॅव्हल्स मालक, टॅक्सी युनियन यांची बैठक घेऊन मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here