Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी खोडले
    राज्य

    मीरा बोरवणकरांचे आरोप अजित पवारांनी खोडले

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : प्रतिनिधी

    पोलिसांच्या येरवडा येथील तीन एकर जमिनीचा २०१० मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता मात्र आपण त्याला नकार दिला असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता केला. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या आत्मचरित्रात याबाबत दावा करण्यात आला आहे. या आरोपांवर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
    माझं काम भलं आणि मी भला, असं करत मी पुढे जात असतो. गेले तीन चार दिवस सातत्याने माध्यमांत बातम्या आल्या. मी त्या बातम्यांना जास्त महत्त्व दिलं नाही. त्या बातम्यांशी माझा दुरान्वये संबंध नाही. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अपवाद मी सरकारमध्ये नव्हतो तो काळ होता. ज्या जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी असते त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावावे असा माझा प्रयत्न असतो. पालकमंत्री या नात्याने आढावा बैठका घेतो. अनेक बैठका घेत असतो. त्या कामाला कशी गती देता येईल, काही समस्या असतील तर सोडवता कसे येतील, याचा प्रयत्न असतो. एखादं काम होत नसेल तर ते का अडलेलं आहे यासाठी विविध विभागातील आढावा घेतो. म्हणून पुण्यातही मी आढाला बैठका घेत असतो. आता एका रिटायर्ड आयपीएस ऑफिसरने पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातून सातत्याने काहीतरी बातम्या येऊ लागल्या. यातून अजित पवार अडचणीत, चौकशी करा. पण, मी काहीही केलं नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. यावेळी त्यांनी २००८ पासून यासंदर्भात झालेल्या बैठकांचेही इतिवृत्त पत्रकारांना वाचून दाखवले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.