अनधिकृत बॅनरवर तात्काळ कारवाई करावी

0
39

साईमत, रावेर : प्रतिनिधी

शहरात नगर पालिका हद्दीत लावण्यात आलेले अनधिकृत बॅनरवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. पालिकेने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

रावेर गावात बऱ्याच लोकांचे वाढदिवसाचे बॅनर हे नगर पालिकेची परवानगी न घेता लावण्यात येतात. तसेच बॅनर हे बरेच दिवस काढले जात नाही. वाढदिवसाच्या बॅनरची परवानगी घेतल्याशिवाय वाढदिवसाचे बॅनर लावू देऊ नये, परवानगीमध्ये बॅनर काढण्याची मुदतही टाकावी, मुदतीचे आत बॅनर न काढल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, वाढदिवसाचे बॅनर लावण्याकामी परवानगी न घेता बॅनर लावल्यास त्यावर कायदेशिर कारवाई दाखल करण्यात यावी, असे न केल्यास रा.काँ.मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. त्याच्या होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार रहाल, असेही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here