ग्लोबल बिजनेस अँन्ड एज्युकेशन अवार्डने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय सन्मानित

0
40

साईमत जळगाव प्रतिनिधी

नवी दिल्‍ली येथे नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्लोबल बिजनेस अँन्ड एज्युकेशन अवार्डने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्‍लीतील हॉटेल विवांता व्दारका येथे आयोजीत कार्यक्रमात गोदावरी नर्सिंगचे प्रतिनिधी म्हणून प्रा. पियुष वाघ यांनी हा पुरस्कार स्विकारला.

१५ ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माजी क्रिकेटपटू मदनलाल शर्मा, माजी सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रीय मंत्री अल्फाँन्स जोसेफ कनंनथनम तसेच छत्‍तीसगडचे माजी राज्यपाल शेखर दत्‍त, युगांडाच्या भारतातील उच्चायुक्‍त जॅकलीन मुकनजिरा, मिशन फाईट बँक संचालक,लेप्ट. कर्नल रोहीत मिश्रा आदिंची उपस्थीती होती.
२०२३ वर्षातील सर्वात उदयोन्मुख उच्च संस्था म्हणून संपुर्ण भारतातून नर्सिंग महाविद्यालयापैकी एकमेव गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचे नामांकन निवडले गेले आहे. सुर्वण पदक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्राप्त सन्मानातून गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावर नवीन ख्याती प्राप्त झाली आहे.

गोदावरी फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, डॉ अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, यांच्यासह गोदावरी परिवाराच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, यांनी आर्शिवाद देत आगामी काळात गोदावरी नर्सिंग हे भारतातील टॉप १० मध्ये यावे अशी इच्छा व्यक्‍त केली. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना वैद्यकिय शिक्षण आणि रूग्णांना निरंतर आरोग्य सेवेचा प्रण संचालक माजी खा.डॉ उल्हास पाटील यांनी हा सन्मान गोदावरी नर्सिंग परिवाराचे पथप्रदर्शक प्रशासकिय अधिकारी प्रविण कोल्हे, प्रो. विशाखा गणवीर यांचेसह महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा सर्व सदस्यांना समर्पित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here