साईमत जळगाव प्रतिनिधी
आज काळ पालटतो आहे. तयार होणारी नवीन पिढी मुळातच ए. आय. तंत्रज्ञानाची भोक्ती आहे पण या नवीन पिढीला योग्य मार्गदर्शनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी उपयुक्त अशा नव-नवीन सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करणे गरजेचे आहे, याच विचारांची कास धरून एस. एस. बी. टी. महाविद्यालयात एम.सी.ए. विद्यार्थ्यांसाठी एक आठवडयाची डेटा सायन्स व ए.आय. आधारीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत एम सी ए विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप पाटील , प्रा. शुभम महाले , प्रा. मिनाक्षी बारी , प्रा.जयश्री मुऱ्हेकर यांनी ए. आय. आधारित तंत्रज्ञाना विषयी या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची सखोल प्रशिक्षण पर कार्यशाळा घेतली. यात एम.सी.ए. च्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त असा सहभाग घेतला. कार्यशाळेचे समन्वयन प्रा. सुमेरसिंग पाटील यांनी केले होते. कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जी. के. पटनाईक, उप-प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. पवार. यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी एम.सी.ए. स्टुडंट्स असोसीएशनचे सर्वे विद्यार्थी समन्वयक तसेच प्रा.सपना फेगडे, महेंद्रसिंग पाटील यांनी परिश्रम घेतले.