साईमत, यावल : प्रतिनिधी
सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून करोडो सनातन हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांका खर्गे, ए.राजा यांच्यासह महाराष्ट्रातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि साम्यवादी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार यावल येथे पोलीस स्थानकात धर्मप्रेमी नागरिकांनी केली. मागील सप्ताहात ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान अंतर्गत यावल येथे झालेल्या कार्यक्रमात याविषयी जागृती केली होती.
सनातन धर्माच्या विरोधात सर्वांनी केलेली वक्तव्ये ही केवळ हिंदूंची धार्मिक भावना दुखावणारी आहेत, असे नसून २८ एप्रिल २०२३ ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘हेट स्पीच’ संदर्भात जी नियमावली घालून दिली आहे. त्यात बसणारी आहेत. त्यामुळे त्या नियमावलीनुसार पोलीस प्रशासनाने स्वतःहून यात दखल घेऊन गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी तक्रार दाखल करताना डॉ.अभय रावते, प्रमोद नेमाडे, भूषण फेगडे, सागर चौधरी, धीरज भोळे, नितीन कोळी, योगेश वारूळकर, भिक्कन महाजन, कमलेश शिर्के, मयूर कुंभार, गोपाल कोलते, अविनाश बारी, निलेश भोईटे, तन्मय बारी, दिगंबर माळी, विजय इंगळे, चेतन भोईटे आदींसह समस्त हिंदुत्ववादी उपस्थित होते.