साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील मारवाड परिसर विकास मंच, ‘मिलके चलो’ आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भारतभर दुर्गम भागातील शाळेत ‘डॉ.कलाम फिरती प्रयोगशाळा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी इस्त्रोचे चेअरमन डॉ.एस.सोमनाथ हे स्वतः माहिती घेऊन राष्ट्रीय पातळीवर प्रकल्पाचे तामिळनाडूतील रामेश्वरम येथे उद्घाटन करण्यात आले. ही एक फिरती प्रयोगशाळा असून विज्ञानासोबत ‘रोबोटिक्स आणि व्यक्तिमत्व विकासावर प्रयोगशाळा’ अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कामगिरी पार पाडणार आहे.
मारवड परिसर विकास मंचचे पदाधिकारी, आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे आणि ‘मिलके चलो’ अमळनेरचे संस्थापक-अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, त्यांची टीम आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या अथक परिश्रमातून कलाम यांचे स्वप्न साकार होणार आहे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नातून अब्दुल कलाम फाउंडेशन सोबत प्रकल्पाची नाळ जुळण्यास मदत झाली आहे. तामिळनाडूतील रामेश्वरम येथे फिरती प्रयोगशाळा १३ तारखेला पोहोचली. त्यानंतर रविवारी, १५ ऑक्टोबर रोजी डॉ.कलाम यांच्या जन्मदिनी इस्त्रोचे चेअरमन डॉ.एस.सोमनाथ, ए.पी.जे. एम.जे.शेख सलीम (डॉ.कलाम यांचे नातू आणि डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे को फाउंडर) आणि इतर कलाम कुटुंबीयांसह देशातील मान्यवर वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत देशाला समर्पित केली.
याप्रसंगी महाराष्ट्रामधून वैज्ञानिक डॉ.दिलीप देशमुख, मिलिंद चौधरी, राजकुमार भामरे, मेघश्याम पत्की, प्रिया ठाकूर, संदीप वारजे, मनीषा चौधरी, मारवड विकास मंचचे प्रतिनिधी देवेंद्र साळुंखे, आशिष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.