साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन झूम मिटिंग आणि स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पध्दतीने मीटिंग आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा पर्यटन समितीचे अध्यक्ष स्वच्छता मॉनिटर धिरज कुमावत ह्या नववीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांनी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. व्ही.आर.खोंडे यांनी मनोगत केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन व्ही. एन.पाटील यांनी केले तर आभार व्ही.एस. कोळी यांनी मानले.